व्हेज स्प्रिंग रोल रेसिपी

मंगळवार, 7 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
दोन कप मैदा
एक कप पत्ताकोबी  
अर्धा कप पनीर किसलेले
एक कांदा बारीक चिरलेला
एक सिमला मिरची बारीक चिरलेली
एक टीस्पून सोया सॉस
एक हिरवी मिरची चिरलेली
चिमूटभर काळीमिरी पूड
अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तेल

कृती-
व्हेज स्प्रिंग रोल बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठा बाउल घ्यावा. आता मैदा चाळून खाण्याचा सोडा घालावा. आता हळूहळू पाणी घालून पीठ बनवावे. तासभर हे मिश्रण झाकून ठेवावे. यानंतर, स्टफिंग करण्यासाठी, एका पॅनमध्ये तेल टाकून ते गरम करावे. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यावे. आता त्यात बारीक चिरलेली कोबी, किसलेले पनीर आणि बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परतवून घ्यावे. यानंतर सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. नंतर मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवा आणि तेल गरम करावे. आता चमच्याच्या मदतीने पातळ पिठाचे मिश्रण तव्यावर डोस्याप्रमाणे पसरवा. आता या पापडीचा गोल रोल करून प्लेट मध्ये काढावी. तर चला तयार आहे आपली व्हेज स्प्रिंग रोल रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती