कृती-
सर्वात आधी मूग डाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. आता भिजलेल्या मुगाच्या डाळीमधून पाणी वेगळे करून ती मिक्सरमध्ये बारीक करावी. एका पॅनमध्ये तूप गरम करून आणि त्यात बारीक केलेली डाळ मंद आचेवर परतवावी. डाळीचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावी. नंतर गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे. आता त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पूड आणि सुका मेवा घालावे. व हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता मिश्रणापासून छोटे लाडू बनवा. तर चला तयार आहे हिवाळा विशेष पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू रेसिपी.