Oats Dhokla हेल्दी ओट्स ढोकळा रेसिपी

Webdunia
शनिवार, 28 जून 2025 (08:00 IST)
साहित्य-
अंकुरलेले मूग - एक कप
ओट्स - १/४ कप
हिरव्या मिरच्या - दोन 
आले किस 
कोथिंबीर 
मेथी - अर्धा कप 
दही - दोन टेबलस्पून
बेकिंग सोडा -अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल-एक टीस्पून
पांढरे तीळ -एक टीस्पून
मोहरी - अर्धा टीस्पून
खोबऱ्याचा किस 
बारीक चिरलेली 
कोथिंबीर
ALSO READ: मऊ आणि जाळीदार ढोकळा रेसिपी
कृती- 
सर्वात आधी अंकुरलेले मूग, आले, हिरवी मिरची, ओट्स आणि दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता कोथिंबीर, मेथी, मीठ आणि बेकिंग सोडा घाला आणि फेटून घ्या.. एका प्लेटमध्ये तूप लावा आणि त्यात मिश्रण पसरवा. मंद आचेवर १०-१५ मिनिटे वाफवून घ्या. शिजल्यानंतर ढोकळा थोडा थंड होऊ द्या. आता एका कढईत तेल गरम करा आणि त्यात मोहरी आणि तीळ घाला. यानंतर ढोकळ्यावर फोडणी घाला. ढोकळा कापून एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर नारळ किस आणि कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे आपली हेल्दी ओट्स ढोकळा रेसिपी.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पोषकतत्वांनी भरपूर मुगाचा ढोकळा रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

संबंधित माहिती

पुढील लेख