Green Moong Dal Dhokla झटपट बनणारी रेसिपी

शनिवार, 22 मार्च 2025 (08:00 IST)
साहित्य-
मूग डाळ-एक कप  
हिरव्या मिरच्या-तीन  
बेकिंग सोडा 
मोहरी 
मीठ चवीनुसार 
लसूण 
आले
कढीपत्ता 
ALSO READ: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी रेसिपी Carrot Potato Tikki
कृती-
सर्वात आधी हिरवी मुगडाळ कमीतकमी २ तास भिजत ठेवावी. नंतर ती मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यामध्ये मीठ, चिरलेल्या लसूण पाकळ्या, आलेपेस्ट आणि हिरव्या मिरच्या तुकडे व चिमूटभर बेकिंग सोडाहे सर्व साहित्य घालावे. व आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करावे. आता ढोकळ्याचे भांडे घ्यावे व  एका प्लेटमध्ये तेल लावून एक चमचा मिश्रण घाला. ते सर्व बाजूंनी चांगले पसरवा आणि त्यावर थोडी तिखट शिंपडा.आता भांड्यात पाणी ओतल्यानंतर, दोन्ही प्लेट्स ढोकळ्याच्या भांड्यात ठेवा. व कमीतकमी सात मिनिटे ठेवल्यानंतर शिजले कि नाही हे पाहून घ्यावे. ढोकळा शिजल्यानंतर ढोकळ्याचे काप करा. एक लहान पॅन घ्या आणि त्यावर थोडे तेल घाला. मोहरी, कढीपत्ता घाला व तडका तयार करा आता त्यामध्ये ढोकळ्याचे तुकडे घाला. आता त्यावर थोडी कोथिंबीर घालावी व तयार ढोकळा प्लेटमध्ये काढावा, आणि गरम ढोकळा चटणी किंवा करीसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: झटपट बनणारी रेसिपी बेसन अप्पे
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती