मशरूमला मिठाच्या पाण्यात धुवून घ्यावे. मग मशरूम कापून एका स्वच्छ भांड्यात ठेवावे. कढईत तेल टाकून त्यात मोहरी, जीरे, मेथीदाने घाला. व त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण पेस्ट टाकून 2 मिनिट परतून नंतर तिखट, धणे पावडर आणि इतर मसाले टाकून परतून घ्या . मग यात चिरलेले मशरूम घालून परतून घ्या. भाजी शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवा. थोडया वेळाने पाणी टाकून झाकण ठेऊन 10 ते 15 मिनिट लहान गॅस वर ठेवा. भाजी शिजल्यावर यात गरम मसाला टाकून गॅस बंद करून मग कोथिंबीर टाकून सजवून सर्व्ह करा..
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.