मेथीचे पराठे बनवण्याची ही सोपी रेसिपी आहे,पांढऱ्या लोणी सह खाण्याचा आस्वाद घ्या

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (12:54 IST)
हिवाळा सुरू झाल्याने बाजारपेठ हिरव्या भाज्यांनी भरले आहे. प्रत्येक भाजी विक्रेत्याकडे विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत. या भाज्या स्वच्छ करणे जरा कठीण आहे पण त्या खाण्याचे फायदे शरीरासाठी दुप्पट आहेत. मेथी ही या हिरव्या भाज्यांपैकी एक आहे. मेथीची पातळभाजी तर बनतेच पण त्याचे पराठेही खूप चविष्ट लागतात. लहान मुलांना तसेच मोठ्यांना मेथीचे पराठे आवडतात. सकाळच्या न्याहारीसाठी आपण मेथीचे पराठे बनवू शकता. हे पराठे आपण दोन प्रकारे बनवू शकता. एक म्हणजे त्याचे सारण तयार करून आणि दुसरे गव्हाच्या पिठात मिसळून,ते सोप्या पद्धतीने कसे बनवायचे चला जाणून घेऊया.
 
 साहित्य-
 स्वच्छ चिरलेली मेथी, गव्हाचं पीठ, बेसन, मैदा, मीठ, ओवा, लाल तिखट, तळण्यासाठी  तूप किंवा तेल 
 
कृती - 
एका मोठ्या परातीत गव्हाचं पीठ, मैदा, बेसन, मेथी, मीठ, ओवा, लाल तिखट एकत्र करून मिसळून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्या. ते खूप सैलसर करू नका कारण नंतर आपल्याला पोळी लाटताना त्रास होऊ शकतो. 

आता जर आपण गव्हाच्या पीठात मेथी मिसळली असेल तर आपल्याला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. कणकेच्या पिठाचा थोडासा भाग घ्या आणि त्याला गोल आकार द्या. नंतर त्यावर तूप लावून त्रिकोणी आकारात दोन घडी करून घ्या नाहीतर त्याला गोल आकार द्यावा. खूप पातळ लाटू नका. लाटून झाल्यावर तव्यावर दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे तेल किंवा तूप लावून शेकून घ्या. तयार पराठे पांढऱ्या लोण्यासह सर्व्ह करा.    
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती