Momos तयार करण्याची सोपी रेसिपी

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (13:24 IST)
मोमोज बनवण्यासाठी साहित्य-
मैदा, तेल, मीठ, पाणी, 2 लसूण बारीक चिरलेले, 1 कांदा बारीक कापलेला, 2 वाटी कोबी, 1 गाजर किसलेला, 1 चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा काळी मिरपूड, एक चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस
 
मोमोज रेसिपी
मोमोज बनवण्यासाठी आधी कणिक मळून घ्या आणि अर्धा तास बाजूला ठेवा. यानंतर एक पॅन घ्या आणि त्यात लसूण आणि कांदा घाला. यानंतर, आता पॅनमध्ये गाजर आणि कोबी घाला आणि परतून घ्या. यानंतर, आता त्यात व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस, मिरपूड आणि मीठ घाला. आता सर्व गोष्टी नीट मिक्स करा, म्हणजे आपले मोमोज स्टफिंग तयार आहे.
 
आता या नंतर पीठ पुन्हा एकसर मळून घ्या. कणकेचा एक छोटा तुकडा घ्या आणि पातळ गोलाकार लाटा. यानंतर, त्यात तयार केलेले सारण ठेवा आणि बंद करा. असे संपूर्ण मोमोज बनवून घ्या. यानंतर हे सर्व मोमो वाफेच्या भांड्यात ठेवा. ते 15 मिनिटे वाफेवर शिजू द्या. त्यानंतर मोमोज काढा. अशा प्रकारे मोमो घरीच तयार केले जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती