Veg Manchurian Recipe बाहेरून ऑर्डर न करता घरीच बनवा व्हेज मंचूरियन, जाणून घ्या सोपी रेसिपी

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (13:18 IST)
व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य- 
कोबी - 2 कप (किसलेली)
शिमला मिर्च -2 (बारीक चिरून)
मध्यम आकाराचा कांदा -2 (बारीक चिरलेला)
आले लसूण पेस्ट - 2 टीस्पून
मैदा - 1 कप
कॉर्न फ्लोअर - 4 टेस्पून
लाल तिखट - 2 चमचे
टोमॅटो चिली सॉस - 3 टेस्पून
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ
पाणी - 1/2 कप
सोया सॉस - 2 टीस्पून
 
 
व्हेज मंचूरियन बनवण्याची पद्धत-
व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी आधी कोबी धुवून किसून घ्या.
आता एक वाडगा घ्या आणि त्यात कोबी, मैदा, मीठ, कॉर्नफ्लोर, लाल तिखट घाला आणि मिश्रण तयार करुन गोळे तयार करा. आता एका कढईत तेल घेऊन हे गोळे तळून घ्या. 
नंतर दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, शिमला मिरची आणि चिमूटभर मीठ घाला. 
नंतर त्यात सोया सॉस आणि टोमॅटो चिली सॉस घाला. 
आता त्यात कोबीचे गोळे घाला आणि मिक्स करा.
आपले व्हेज मंचूरियन सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती