बाजारात समोसे मिळतात ज्यात बटाट्याची स्टफिंग असते, परंतु आपल्याला काही हेल्दी खायचं असेल तर आपण त्यात बटाट्यांसह भाज्या देखील घालू शकतात. हे समोसे तयार करणे सोपे आाहे. आपण हवं असल्यास याला ऑलिव्ह ऑयलमध्ये तळून खाऊ शकता.
1 टेबलस्पून स्प्रिंग अनियन
1/2 कप पत्तागोभी (बारीक चिरलेली)
1 टीस्पून आलं (बारीक चिरलेलं)
सर्वात आधी एका बाउलमध्ये मैदा, मीठ आणि जरा पाणी मिसळून कणिक मळून घ्या. दुसर्या बाउलमध्ये मटार, पत्तागोभी, स्प्रिंग अनियन, सोया सॉस, मिरपूड आणि मीठ घालून चांगलं मिक्स करुन स्टफिंग तयार करुन घ्या. आता कणेकेच्या लहान-लहान गोळ्या तयार करा आणि लाटून त्यात एक चमचा स्टफिंग ठेवा नंतर त्याला समोसेचा आकार देऊन बंद करा. तेज आचेवर कढईत तेल गरम करा नंतर तेलात 4-5 समोसे टाकून सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. या प्रकारे सर्व समोसे तळून घ्या. तयार समोसे गरमागरम चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.