वाटाणे रात्री भिजत घाला. सकाळी कुकर मध्ये शिजवून घ्या त्यात मीठ, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार कप पाणी घालून कुकर तीन शिटी देऊन बंद करा. आता मंद गॅस वर हे राहू द्या.
रगडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅस वर कढई तापत ठेवा त्यात 2 चमचे तेल घाला. मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, घालून परतून घ्या. त्यात वाफलेले वाटाणे घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.
पॅटिस बनविण्यासाठी बटाटे उकडवून मॅश करून घ्या त्यात मीठ,हळद, धणेपूड,जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, हळद ,आलं लसूण पेस्ट कोथिंबीर,हिरवी मिरची आणि ब्रेड क्रम्ब्स घालून मिसळून घ्या. आता हातावर बटाट्याची गोळी घेऊन पारी तयार करून पॅटिस बनवा आणि हे पॅटिस तेलात तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. सर्व पॅटिस तळून घ्या.