होळीच्या दिवशी पाहुण्यांना सर्व्ह करा गरमागरम पालक कबाब

सोमवार, 7 मार्च 2022 (11:59 IST)
पालक कबाब बनवण्यासाठी साहित्य-
पालक
काजू
जिरेपूड
हींग
कोथिंबीर
ओवा
तेल
दही
बेसन
मीठ
 
पालक कबाब बनवण्याची कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये कापलेले रोस्टेड काजू, जिरेपूड, हींग आणि हिरवी कोथिंबीर मिसळून स्टफिंग तयार करा.
एका पॅनमध्ये जरा तेल गरम करा आणि त्यात हींग, जिरे आणि ओवा टाका, नंतर चिरलेला पालक घालून काही मिनिटांसाठी भाजून घ्या.
आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढा आणि दोन चमचे दही, बेसन आणि मीठ घालून मिक्स करा.
मिश्रणला गोल आकार द्या आणि मधोमध स्टफिंग करुन कवर करा आणि पॅनमध्ये शेलो फ्राय करा. पालक कबाब तयार आहे, आपण हे चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती