कृती-
दही भल्ले बनवण्यासाठी सर्वात आधी भिज़लेली उडीद डाळ पाण्यातून गाळून घ्या, व मिक्सरमध्ये घाला आणि पेस्ट करा. आता त्यात हिंग घाला आणि ते मलईदार होईपर्यंत फेटून घ्या. यानंतर या पेस्टमध्ये धणे, भाजलेले जिरे, हिरवी मिरची आणि आले घालावे. तसेच मनुके आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि ते तळून घ्यावे. यानंतर हे तळलेले गोळे मिठाच्या पाण्यात भिजवा आणि काही वेळ बाजूला ठेवा. नंतर एक तासानंतर पाणी पिळून काढा. यानंतर, वर गोड दही, भाजलेले जिरे, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे आणि चाट मसाला घाला. तसेच गरम मसाला आणि कोथिंबीरची पाने घालून सजवा.