कृती-
सर्वात आधी शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्या. व त्यातील बिया काढून घ्या. यानंतर बटाटे उकडवून मॅश करावे.आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर, टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण घाला आणि सर्वकाही चांगले शिजवा. या मिश्रणात मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर,लवंगा, गरम मसाला, धणे पूड, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता हे स्टफिंग सिमला मिरचीच्या आतमध्ये भरावे. यानंतर, एका पॅनमध्ये थोडे तेल टाका आणि ते गरम करा. आता त्यामध्ये शिमला मिरची ठेवा. आता भांडे झाकून ठेवा आणि शिमला मिरची काही वेळ शिजू द्या. तर चला तयार आहे आपली भरलेली शिमला मिरची रेसिपी, पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.