कृती-
सर्वात आधी गाजर आणि उकडलेले बटाटे सोलून घेऊन किसून घ्यावे. आता एका मोठ्या बाऊलमध्ये राजमा घेऊन त्यामध्ये मटार घालून एकत्र करावे. यानंतर त्यात कांदा, बटाटा, गाजर, बेसन घालावे आणि चांगले मिक्स करा. यानंतर मसाले आणि मीठ घाला चांगले मिसळा. तसेच कोथिंबीर घालावी. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि नंतर हाताच्या मदतीने ते थोडेसे सपाट करा. ज्यामुळे त्याला टिक्कीचा आकार मिळेल. यानंतर, तव्यावर तूप टाकून सर्व टिक्की तव्यावर तळून घ्या. आता तयार टिक्कीवर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली राजमा टिक्की रेसिपी, हिरवी चटणी, सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.