लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी

बुधवार, 22 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
लिंबू - आठ
हिरव्या मिरच्या - 100 ग्रॅम
आले - 50 ग्रॅम
लोणचे मसाला - दोन चमचे
ओवा - एक टीस्पून
काळे तीळ - एक टीस्पून
हळद - एक टीस्पून
काश्मिरी मिरची - एक टीस्पून
हिंग - अर्धा टीस्पून
मीठ - दोन चमचे
काळे मीठ - एक टीस्पून
लिंबाचा रस - दोन चमचे
ALSO READ: झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी
कृती-
सर्वात पहिले लिंबू, आले आणि मिरच्या स्वच्छ धुवून वाळवून घ्या. आता आले सोलून घ्यावे. तसेच,  हिरवी मिरची, आले आणि लिंबू कापून घ्या. आता एका काचेच्या बरणीत चिरलेला लिंबू, मिरची आणि आले घालावे. नंतर वरील सर्व मसाले घालून हलवून घ्यावे. तसेच मीठ, लिंबाचा रस घालावा आणि चांगले मिसळा. मग ते दोन ते तीन दिवस ही बरणी उन्हात ठेवा. तर चला तयार आहे आपले लिंबू आल्याचे लोणचे रेसिपी, खिचडी सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती