मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत तेल गरम करावे. नंतर त्यात हिंग घालून तडतडून घ्यावे. यानंतर त्यात कांदा, लसूण आणि आले घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.नंतर त्यात टोमॅटो घालून शिजवा. यानंतर त्यात हळद, धणेपूड, तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करावे.आता दही घालावे. या सर्व गोष्टी नीट शिजवून घ्याव्या. यानंतर थोडे पाणी घालून उकळू द्यावे. नंतर त्यात पनीर आणि मटार घालून मिक्स करून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यावे.भाजी घट्ट होईपर्यंत शिजवा.शिजल्यावर गॅस बंद करून भाजी वरती हिरवी कोथिंबीर टाकून गार्निश करावे. तर चला तयार आहे आपले मटर पनीर रेसिपी, पुरी किंवा पुलाव सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.