भेंडी मसाला Bhindi Masala Recipe

शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:45 IST)
भेंडी चिरलेली- 250 ग्रॅम
टोमॅटो - 1 स्लाइसमध्ये चिरलेला
कांदा - 1 बारीक चिरलेला
आलं-लसूण पेस्ट - 1 लहान चमचा
जिरपूड - 1/2 लहान चमचा
हळद - 1/2 लहान चमचा
लाल तिखट - 1/4 लहान चमचा
धणेपूड - 1/2 लहान चमचा
आमचूर पावडर - 1/4 लहान चमचा
चाट मसाला- 1/4 लहान चमचा
गरम मसाला- ¼ चमचा
कसूरी मेथी- 1/2 लहान चमचा
तेल तलण्यासाठी
मीठ चवीप्रमाणे
 
कृती
पंजाबी भेंडी मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा.
आता तेलात भेंडी टाकून हलकी तळून घ्या.
आता भेंडी तळून प्लेटमध्ये काढून घ्या.
उरलेल्या तेलात जिरे, कांदा, आलं-लसूण पेस्ट टाकून चालवून घ्या.
आता कांदा शिजल्यावर टोमॅटो टाकून 1 मिनिट चालवून घ्या.
आता हळद, धणेपूड, तिखट आणि जिरपूड टाकून दोन मिनिट शिजवून घ्या.
आता गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, कसूरी मेथी आणि मीठ टाकून शिजवून घ्या.
मसाला शिजल्यावर भेंडी टाकून 10 मिनिट शिजवा.
गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर घालून पराठा किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती