भिंतींवर वास्तूप्रमाणे लावा फोटो, दूर होतील सर्व अडचणी
सोमवार, 24 जून 2019 (14:03 IST)
तुमचे घर असो वा तुमचे ऑफिस याला सजवून ठेवायला सर्वांनाच आवडत. अशात तुम्ही बाजारात मिळत असलेल्या वेग वेगळ्या प्रकारचे सजावटीचे सामान विकत घेऊन येता. घर सुंदर दिसायला पाहिजे म्हणून तुम्ही भिंतींवर पेटिंग्स लावता आणि तुमच्या भिंती सुंदर दिसू लागतात, पण तुम्हाला हे माहीत आहे का, की घरात लागलेल्या पेटिंग्स तुमच्या कुटुंबाला नुकसानदेखील पोहोचवू शकते. शास्त्रात सांगण्यात आले आहे की ज्या प्रकारच्या वस्तु तुम्ही तुमच्या घरात ठेवता तसाच प्रभाव तुमच्या घरावर देखील पडू लागतो. तर जाणून घेऊ घरात कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजे आणि कोणत्या नाही....
पूर्व दिशेत सूर्योदय होत असल्याने या दिशेत सूर्योदय अथवा सूर्यवंशी प्रभू श्री रामाच्या दरबाराचे फोटो लावायला पाहिजे ज्याने घराच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होते, आणि कुटुंबीयांचे आरोग्य देखील उत्तम राहते.
फल, फूल किंवा हिरवे गार वृक्ष जीवनात शक्तीचे प्रतीक असतात. अशा फोटोंना लावायची सर्वात शुभ जागा आहे पूर्व किंवा उत्तर दिशेतील भिंती.
उत्तर दिशेला कुबेराची दिशा म्हणण्यात आली आहे, म्हणून धनवृद्धीसाठी या दिशेत धनाची देवी महालक्ष्मी आणि बुद्धी प्रदाता गणेश आणि रत्न किंवा आभूषण सारखे संपन्नता दर्शवणारे चित्र लावायला पाहिजे.
पर्वत आणि रॉक्स लॅंडस्केपाला दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंतींवर लावल्याने मनोबल वाढत. जर अशा पेंटिंग्स पूर्वेकडे लावले तर या मुळे तुमचे सौभाग्य बाधित होत.
पाण्याचे लॅंडस्केप ज्यात समुद्र, नद्या, तलावाचे दृश्य असेल, ते उत्तर आणि पश्चिम दिशेच्या भिंतींवर लावणे म्हणजे सुख समृद्धीला आमंत्रण देण्यासारखे आहे. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर बुद्ध किंवा महावीर स्वामीचे फोटो दक्षिण दिशेला सोडून अशा जागेवर लावा जिथे तुमची दृष्टी सारखी सारखी तेथे पडेल.
कुटुंबातील सदस्यांचे प्रसन्न मुद्रेतील फॅमेली फोटो घराच्या उत्तर, पूर्व दिशा किंवा उत्तर-पूर्व दिशेत लावायला पाहिजे. असे केल्याने घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद दूर होऊन आपसात प्रेम वाढत.