ताकदीसाठी हिवाळ्यात खा उडदाचे लाडू, सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसात ड्राय फ्रूट्सचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. तसेच तुम्ही यांपासून लाडू बनवू शकतात. हे हिवाळ्यात शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया हे लाडू कसे बनवायचे ते- 
साहित्य- २ कप उडदाचे पीठ, ५० ग्रॅम सुंठ पूड, १५० ग्रॅम खाण्याचे डिंक, २०० ग्रॅम खोबर्‍याचे किस, ३५० ग्रॅम पीठी साखर, १/२ चमचा वेलदोडा पूड, गरजेपुरता शुद्ध तूप, १ मोठी वाटी बदाम, खजूर, कापलेले अक्रोड, केशर 
 
कृती- बारीक केलेल्या डिंकाला तूप गरम करून तळून घ्यावे. जेव्हा तो फुलून त्याचा आकार मोठा दिसला की त्याला तुपातुन काढून घ्यावे. उरलेल्या तुपात उडीद डाळीचे पीठ टाकून मंद आचेवर सुवास येईपर्यंत भाजून घ्यावे. गरज असल्यास तूप टाकावे. पीठ भाजल्यावर त्यात सुंठ पूड टाकावी आणि परत भाजावे. गॅस बंद करून या मिश्रणला मोठ्या परातीत काढून ठंड करावे. 
 
त्या कढईत थोडेसे तूप टाकून काप केलेला सुकामेव भाजून घ्यावा. तसेच खोबरे किस टाकून हालवून घ्यावे आणि लगेच गॅस बंद करावा. उडिद पीठ कोमट झाल्यानंतर यात पीठी साखर, तळलेल डिंक, मेवा, वेलदोडा पूड, केशर टाकावे. आकार देऊन लाडू वळवून घ्यावे. थंडीच्या दिवसात हे लाडू खुप आरोग्यदायी असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती