दह्याला जाड्या कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचं सर्व पाणी निथरल्यावर दही घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढावं.
या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावं. त्या मँगों पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावं.
वरुन पिस्ता घालून गार सर्व्ह करावं.
टिप: आपण दही घरी देखील तयार करु शकता. यासाठी आदल्या रात्री दुध कोमट करून त्यात दोन चमचे विरजणाचे दही घालून मिसळून घ्यावे. नंतर धक्का लागणार नाही किंवा न हलवता भांङे एका जागी ठेवावे. सकाळपर्यंत छान घट्ट दही तयार होते.