काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बुधवार, 24 मार्च 2021 (08:15 IST)
आपण काचेची भांडी दररोज वापरण्यात घेत नाही, तरीही ते ठेवल्या ठेवल्या चमक गमावतात. त्यांना स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स आहे जर आपण दररोज वापरात असाल तर त्यांना चकचकीत कसे ठेवावे या साठी टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या. 
 
1 व्हिनेगर वापरा- डिझाईनच्या क्रॉकरीमध्ये डाग लागल्यावर त्यांना स्वच्छ करणे अवघड असते. यासाठी क्रॉकरी व्हिनेगरच्या कोमट पाण्यात भिजवून एक तास  ठेवा,नंतर नायलॉनच्या स्क्रबर ने घासून धुवा नंतर कपड्याने पुसून घ्या, काचेच्या भांडीत चमक येईल.   
 
2 टॉवेल टाकून धुवावे -काचेची भांडी साबणाने धुतांना हातातून निसटून जातात आणि फुटतात. असं होऊ नये यासाठी सिंकमध्ये जुना टॉवेल अंथरा या मुळे त्या टॉवेलवरच भांडी पडतील फुटणार नाही.
 
3 लिंबाच्या सालीचा वापर- काचेची भांडी बऱ्याच दिवसानंतर काढल्यावर त्यांच्या वरील चमक कमी होते. या परिस्थितीत पाण्यात लिंबाचे साल मिसळा आणि कपड्याने भांडी पाण्यातच स्वच्छ करा. भांडी चमकतील. 
 
4 भांडी वेगळे ठेवा- काचेच्या ग्लासाला एकटक घालून ठेऊ नका. असं केल्याने त्यांच्या वर स्क्रॅच येतात. काम झाल्यावर त्यांना वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवा. 
 
5 बेकिंग पॉवडर वापरा- बऱ्याच लोकांची सवय असते की ते काचेच्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी भांड्याचा साबणाचा वापर करतात. त्या साबणाचे डाग काचेच्या भांड्यांवर दिसतात. काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बेकिंग पावडर मिसळा आणि त्यातून काचेची भांडी धुऊन काढा. असं केल्याने काचेची भांडी स्वच्छ होतील. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती