प्रत्येक स्त्रीने आपल्या आहारात हे व्हिटॅमिन्स समाविष्ट केले पाहिजे

मंगळवार, 23 मार्च 2021 (17:09 IST)
आपल्या सर्वाना हे माहीत आहे की शरीराला सुरळीतपणे चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता आहे. या मध्ये प्रथिने, झिंक, पोटॅशियम, केल्शियम, मॅग्नेशियम, फास्फोरस, व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. आपल्या शरीरातून एका वयानंतर व्हिटॅमिन कमी होऊ लागतात. विशेषतः स्त्रियांच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता होऊ लागते.त्या मुळे त्यांना अनेक विकार होऊ लागतात. तज्ज्ञ सांगतात की त्यांनी आपल्या आहारात या व्हिटॅमिन्सचे सेवन आवर्जून करावे. 
 
*व्हिटॅमिन ए - व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी, रोग प्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे ,स्त्रियांची रोग प्रतिकारक शक्ती बळकट करतो.आपल्या आहारात हिरव्यापालेभाज्या संत्री, टोमॅटो, फळे,आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करावा.  
 
* बायोटिन- फॅटी ऍसिड आणि रक्तातील साखरेच्या निर्मितीमध्ये बायोटिन महत्त्वाची भूमिका बजावतात. हे शरीरात ऊर्जा निर्माण करतात. बायोटीनच्या कमतरतेमुळे केसांची गळती होते.नखे कमकुवत होतात,चेहऱ्यावर लालडाग येतात.गरोदर स्त्रियांसाठी बायोटिन आवश्यक आहे. बायोटिन आपल्याला फुलकोबी, बीट, बदाम,अवाकाडो,मध्ये आढळते.
 
*व्हिटॅमिन बी - शरीराला ऊर्जा देण्यासाठी व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 आहाराला इंधनाच्या रूपात बदलतात. हे दोन्ही व्हिटॅमिन त्वचा,केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. मज्जासंस्था सुरळीत कार्य करण्यासाठी व्हिटॅमिन बी 6 आणि बी 12 महत्त्वाचे आहे. स्नायू टोन आणि मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी आपण ह्याचे सेवन करू शकता. व्हिटॅमिन बी 6 आणि बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा,थकवा,भूक न लागणे,पोटात वेदना,नैराश्य,हात आणि पाय सुन्न होणे या सारख्या समस्या जाणवतात.तसेच केसांची गळती, एग्झिमा,मुलांच्या शारीरिक-मानसिक विकास रोखतो. या साठी आहारात भाज्या,वरण,अंडी,हिरव्या पालेभाज्या,दुधाचे पदार्थ घ्यावे.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती