पौगंडावस्था, जीवनातील असा काळ आहे जेव्हा मुलांचे योग्य संगोपन करणे महत्त्वाचं आहे.एकदा योग्य संगोपन झाले तर पुढील आयुष्य चांगलं होतं. पौगंडावस्थांतील मुलांचे स्वभाव वेग वेगळे असतात. प्रत्येक पालकाची आपल्या मुलांना वाढविण्याची पद्धत वेगवेगळी असते.काही आपल्या मुलांशी कठोर व्यवहार करतात तर काही पालक स्वभावाने सौम्य असतात.पण चांगल्या आणि योग्य संगोपनासाठी स्वभावात मिश्रण असणे आवश्यक आहे. आपण देखील आपल्या मुलांना योग्य आणि चांगले संगोपन देऊ इच्छिता तर या पद्धती अवलंबवून बघा.
1 घराचे वातावरण चांगले ठेवा-
घराचे वातावरण चांगले असेल तर मुलांची वाढ चांगली होईल. जर घरात तणावाचे वातावरण असेल तर मुलं देखील घाबरलेले आणि चिंताग्रस्त असतील. म्हणून आवश्यक आहे की घरातील वातावरण चांगले आणि आनंदी ठेवावं. जेणे करून मुलं देखील आनंदी राहतील आणि आपल्याशी जोडलेले राहतील.त्यांना घरात राहणे आवडेल .ते बाहेरच्या लोकांना आनंद देतील आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिकतील.
2 मैत्री करा-
तारुण्यवयात आवश्यक आहे की आपण मुलांशी मैत्री करावी. जर आपण त्यांच्या वर आपले मत लादले किंवा जास्त कठोरतेने वागल्यावर ते आक्रमक होतील. जर आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवलं तर ते स्वतःच्या सर्व गोष्टी आपल्याशी सामायिक करतील.त्यांना काही समस्या असल्यावर त्यावर आपण तोडगा देखील काढू शकाल. जर आपले संबंध मुलांशी मैत्रीचे नसल्यास तर आपल्यासाठी त्यांना समजून घेणं अवघड जाईल.
3 त्यांना जबाबदार बनवा-
वयानुसार त्यांना जबाबदार बनवायचा प्रयत्न करा. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला सांगा. त्यांचा वर विश्वास ठेवा. जर आपण त्यांना जबाबदार बनवलं तरच त्यांच्या मानसिक क्षमतेत वाढ होईल. त्यांना पैसे द्या आणि सांगा की एवढ्याच पैशांमध्ये सामान आणायचे आहे.असं केल्यानं ते स्वतः शिकतील आणि गरज पडल्यास ते सर्व काम स्वतः करतील
4 हक्क गाजवू नका-
जर तारुण्यावस्थेत मुलांवर हक्क गाजविल्यावर त्यांना वाटेल की ते एखाद्या तणावा खाली वावरत आहेत. त्यांना आपल्या सह गुदमरल्यासारखं वाटेल. त्यांचे मेंदू आणि मन स्वतंत्र राहू शकणार नाही. दिवसेंदिवस ते बंडखोर होऊ लागतील. त्यांचा मनात नकारात्मक विचार येऊ लागतील. ते एकटे राहणे पसंत करतील आणि कालांतराने आपल्या पासून लांब जातील. म्हणून त्यांच्या वर हक्क गाजविण्यापेक्षा त्यांना स्वतःमध्ये सामील करा.