1 फ्रोजन भाज्यांना डीफ्रॉस्ट करा -
कोबी,मटार,गाजर या भाज्यांना आधी डीफ्रॉस्ट करा या वरील साठलेले बर्फ वितळू द्या. या मुळे स्वयंपाकात लागणारा वेळ कमी लागेल.
2 मायक्रोवेव्ह मध्ये ठेऊ नका किंवा उकळवू नका-
काही स्त्रिया फ्रोजन भाज्या थेट पाण्यातून उकळण्यासाठी ठेवतात. असं करणे योग्य नाही. वापरण्यापूर्वी भाज्या समान तापमानात ठेवा नंतर वापरण्यास घ्या. तसेच मायक्रोव्हेव मध्ये देखील ठेऊ नका. या मुळे भाजी खराब होईल.
3 जास्त काळ साठवून ठेवू नका-
फ्रोजन भाज्या बऱ्याच काळ चांगल्या राहतात. म्हणून जास्त काळ त्याला ठेवू नका. फ्रोजन भाज्या कोरड्या होतात. बर्फामुळे त्यावर ओलावा असतो. फ्रोजन भाज्या एक किंवा दोन आठवड्यातच वापर करा.
* फ्रोजन भाज्या कश्या वापरायच्या -
आपल्याला फ्रोजन भाज्या त्वरित वापरायच्या असतील तर आपण उकळलेल्या पाण्यात घालू शकता.नंतर आपण ते वापरण्यास घेऊ शकता.