कोरोना व्हायरस आणि त्याच्या भीतीपासून कसा बचाव कराल जाणून घ्या

रविवार, 9 मे 2021 (08:30 IST)
कोरोना काळात लोकांच्या मनात नैराश्य, औदासिन आणि भीती सह नकारात्मक विचार उद्भवतात. तरीही अजून देखील काही लोक मास्क लावत नाही सामाजिक अंतर ठेवत नाही. निष्काळजीपणाने वागत आहे. त्यांचा हा आजार होत आहे.अशा परिस्थितीत कोरोना विषाणू पासून कसे वाचावे जाणून घेऊ या. 
 
1 नकारात्मक बातम्यांपासून आणि उपचार पासून दूर राहा-सोशल मीडिया वर ज्ञान देणारे आणि नकारात्मकता पसरवणारे लोकं आहे .या पासून स्वतःला लांब ठेवा. फोन वर देखील जास्त बोलू नका त्याच लोकांशी बोला जे सकारात्मक विचारसरणीचे आहे. तसेच जे आपल्याला प्रेरित करतात. 
 
2 रुग्णालय भरलेले असून लोक निष्काळीजपणा करतात- 
कोरोना साथीच्या रोगाला घेऊन लोकांमध्ये भीती आहे. हेच कारण आहे की लोक घरात बरे होऊ शकतात ,तरीही रुग्णालयाची धाव घेत आहे आणि काही लोक असे आहे जे रुग्णालयात जावे लागू नये  या भीतीने घरगुती उपचार घेत आहे. सर्दी पडसं ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरितच डॉ.शी संपर्क साधावे. तसेच स्वतःला आयसोलेट करावे.
 
3 साथीच्या आजाराचा उपचार शक्य आहे पण भीतीचा नाही-
डॉ.म्हणतात की घाबरल्याने आणि काळजी केल्याने आपली प्रतिकारक शक्ती कमी होते. या काळात प्रतिकारक शक्ती वाढविणे महत्त्वाचे आहे. आपली प्रतिकारक शक्ती वाढवा. घाबरून जाऊ नका. 
 
4 झोप आणि व्यायाम- पुरेशी झोप आणि व्यायाम हे आपल्याला ऊर्जावान करते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढविण्याचे काम करते. कमीत कमी 8 तासाची झोप घ्यावी. 
 
5 सकस आहार घ्यावा - आपल्याला कोरोनाचे लक्षण आहे तर स्वतःला घरात आयसोलेट करा, नारळपाणी, संत्री,मोसंबी,हळदीचे रस,किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.च्यवनप्राश खा. मिठाचे गुळणे करा.वाफ घ्या. वास आणि चव येत आहे तर घाबरण्याची गरज नाही. डॉ.चा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा. रिपोर्ट येण्याची वाट बघू नये. ऑक्सिमीटर ने ऑक्सिजन पातळीची चाचणी करत राहा. मकरासन केल्याने ऑक्सिजन पातळी चांगली राहते. 
 
 6 कोरोना विषाणू समजून घ्या - हा फार मोठा आजार नाही ज्यांना झाला ते बरे झाले ज्यांनी भीती न बाळगता उपचार सुरु केले आहेत ते लवकरच बरे झाले आहे.कोरोना संक्रमित तेच लोक होत आहे जे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करीत नाहीत. आतापर्यंत डॉक्टर, परिचारिका, पॅथॉलॉजिस्ट, स्वछताकर्मी, पोलिस आणि इतर कोरोना वॉरियर्सचा प्रश्न आहे, तर रुग्णांची सेवा करतांना त्यांना संसर्ग झाला आहे आणि त्यापैकी बरेच बरे झाले आहेत. म्हणून घाबरू नका, समजून घ्या सामाजिक अंतर राखा,मास्क लावा, वेळोवेळी हात धुवा. 
आपण वरील नियमांचे पालन केल्यास आपल्यास कोरोना कधीच लागणार नाही. आज नाही तर उद्या ही वेळही निघून जाईल. तोच जिंकतो जो आपल्या मनाची शक्ती वाढवतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती