कोविड -19 च्या काळात मुलांसह कसं राहावं

सोमवार, 10 मे 2021 (21:30 IST)
कोरोना विषाणूची दुसरी लाट बर्‍याच वेगाने पसरत आहे. प्रत्येक वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहे. या काळात मर्यादितपेक्षा अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांची काळजी घेण फार महत्वाचे आहे. तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असते , परंतु मुलांमध्ये तसे नाही. काही मुलं लहानपणापासूनच अधिक कमकुवत आणि अशक्त असतात. म्हणून त्यांची काळजी घेण आवश्यक आहे.
 
चला ,तर मग जाणून घ्या कोरोना काळात मुलांची काळजी कशी घ्यावी-
 
संक्रमण काळात निश्चितच बाहेर नकारात्मकतेचे वातावरण आहे.परंतु घरात सकारात्मक वातावरण ठेवा.
 
- घरात देखील मुलांपासून शारीरिक अंतर ठेवा.
 
- हळू हळू मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगा, प्रयत्न करा की त्यांनी हट्टीपणा करू नये.  
 
- त्यांना कोरोना संसर्गाशी संबंधित व्हिडिओ किंवा फोटो दाखवू नका. जेणे करून त्यांच्या मनात भीती निर्माण होईल .
 
- मुलांना काही उपक्रमांशी जोडून ठेवा. आपण त्यांना चित्रकला, गाणे, लेखन किंवा पुस्तके वाचणे, मनाचे खेळ यासारख्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवू शकता.
 
- मुलांना त्यांचा आवडता कार्यक्रम काही काळ पाहू द्या. यामुळे, त्यांचे मन देखील व्यस्त राहील.
 
- मुलांना मोबाइलमध्ये काही प्रेरणादायक कथा देखील दाखवू शकता. तसेच, मोबाइलमध्ये ते काय बघत आहे या कडे देखील लक्ष ठेवा.
 
- तो खेळू शकतील असे बरेच घरातील (इंडोर)खेळ आहेत. आपण त्यांच्याबरोबर थोडा वेळ खेळू शकता, त्यांनाही ते आवडेल.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती