केसां व्यतिरिक्त हेयर स्प्रे असा देखील वापरता येतो

रविवार, 14 मार्च 2021 (09:25 IST)
आता पर्यंत आपण केसांमध्ये हेयर स्प्रे वापरतं होतो. परंतु हेयर स्प्रे चा असा देखील वापर केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या.  
 
1  भांडी चमकवा -
चांदी किंवा इतर धातूची भांडी चकचकीत करण्यासाठी हे वापर करा या साठी भांड्यांवर हेयर स्प्रे घाला आणि स्वच्छ कपड्याने घासून पुसून घ्या. भांडी चकचकीत होतील.  
 
2 नेलपेंट चे डाग स्वच्छ होतात- 
फरशीवर नेलपेंट सांडली असल्यास त्या ठिकाणी हेयर स्प्रे करा आणि कपड्याने पुसून घ्या. डाग स्वच्छ होतील.  
 
3 ग्लिटर चिटकवा- 
मुलांना प्रकल्पात किंवा काही क्राफ्ट वस्तू सजविण्यासाठी ग्लिटरला  वापरतात. या साठी आपण गोंद किंवा गम चा वापर ना करता हेयर स्प्रे वापरा.  
 
4 भिंतीवरील डाग जातात- 
लहान मुलांनी शाई चे डाग किंवा पेनाने काही कलाकारी केली असल्यास भिंतीवरील डाग जातात. या साठी भिंतीवर हेयर स्प्रे करा आणि कपड्याने स्वच्छ करा. डाग नाहीसे होतात.   
 
5 पाने जपून ठेवा- 
आपल्याला कोणतेही प्रकल्पासाठी किंवा आर्टचे काम करण्यासाठी झाडाची पाने जपून ठेवायची असल्यास पानावर हेयर स्प्रे करा. या मुळे पानाचा रंग देखील तसाच राहील आणि पाने चांगले राहतील.  
 
6 चामड्यावरील डाग काढण्यासाठी -
जर आपल्या कडे चामडी चपला किंवा शूज आहे आणि त्यांचा वर काही डाग लागले आहे तर हेअर स्प्रे करून आपण ते स्वच्छ करू शकता. स्प्रे करून कपड्याने पुसून घ्या. चामडं नवीन दिसेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती