किचन हॅक्स- गॅस चे बर्नर स्वच्छ करण्यासाठी टिप्स

शुक्रवार, 12 मार्च 2021 (08:45 IST)
घराच्या स्वच्छते प्रमाणे गॅस चे बर्नर स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण गॅस बर्नर स्वच्छ करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 सोड्याने स्वच्छ करा-
एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस आणि सोडा मिसळा बर्नर घालून ठेवा आणि 15 मिनिटे झाकून ठेवा. बर्नर स्वच्छ होतील. जर अजून स्वच्छ झाले नाही तर डिटर्जंट टूथब्रशला लावून स्वच्छ करून घ्या. अशा पद्धतीने आपण दर 15 दिवसा नंतर बर्नर स्वच्छ करू शकता. 
 
2 लिंबाची साल आणि मीठ -
रात्री झोपताना गॅस बर्नरला लिंबाचा रस मिसळलेल्या गरम पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. सकाळी त्याच लिंबाच्या सालाला मीठ लावून स्वच्छ करा. २ मिनिटातच  गॅस बर्नर स्वच्छ होईल. दर 15 दिवसा नंतर आपण हे करू शकता. 
 
3 व्हिनेगर ने स्वच्छ करा- 
बर्नर स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. या साठी एका वाटीत व्हिनेगर घाला. या मध्ये 1 मोठा चमचा बेकिंग सोडा मिसळा. बेकिंग सोड्यात एक्सफॉलिएट चे गुणधर्म आढळतात. जे गॅस बर्नरच्या आतील साचलेली घाण बाहेर काढतात. गॅस बर्नरला रात्र भर या घोळात बुडवून ठेवा सकाळी टूथब्रशने स्वच्छ करा. गॅस बर्नर चमकेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती