कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

शुक्रवार, 5 मार्च 2021 (10:00 IST)
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते. घरी साबुदाण्याच्या पापड्या करताना काही गोष्टींना लक्षात ठेवा. जेणे करून पापड्या चांगल्या बनतील चला तर मग जाणून घेऊ या काय आहे टिप्स.
 
* साबुदाण्याची निवड- 
सध्या बाजारपेठेत साबुदाण्याचे बरेच प्रकार मिळतात.आपण लहान मोठे कोणत्याही आकाराच्या साबुदाण्याच्या पापड्या बनवू शकता. लक्षात ठेवा की साबुदाणा जेवढा पारदर्शक असेल साबुदाण्याच्या पापड्या चांगल्या बनतील. 
 
* साबुदाणा स्वच्छ कसा कराल -
काही लोक साबुदाणा शिजविण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ करतात. असं करू नये.या मुळे साबुदाण्यातील पावडर देखील पाण्याने धुतले जाईल आणि पापड्या चांगल्या बनणार नाही. साबुदाणा निवडून पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तर त्यामध्ये एक लीटर पाणी घाला. या पेक्षा अधिक पाणी घालू नका. 
 
* साबुदाणा शिजवायचा कसा-
रात्र भर साबुदाणा पाण्यात भिजत पडू द्या त्याच पाण्यासह सकाळी साबुदाणा गॅसवर शिजवून घ्या. गॅस मंद ठेवा साबुदाणा ढवळत राहा. असं केल्याने त्यामध्ये गाठी पडत नाही, साबुदाणा देखील जळत नाही आणि भांड्याला चिकटत देखील नाही.  
 
* घोळ कसा तयार करावा- 
साबुदाण्याचे घोळ जास्त पातळ नसावे आणि घट्ट देखील नसावे. पॉलिथिनवर टाकल्यावर ते पसरू नये. घोळ घट्ट झाले असल्यास त्यामध्ये गरम पाणी घालून रवीने घुसळून घ्या. घोळ पातळ झाले असल्यास त्याला गॅसवर शिजवावे लागणार. साबुदाण्याच्या घोळात मीठ कमी घाला नाही तर हे खारट होऊ शकतात. आपण या मध्ये जिरे देखील घालू शकता.
 
* वाळवायचे कसे-
साबुदाण्याच्या घोळ तयार झाल्यावर पॉलिथिनवर गोलगोल पसरवून घ्या. घोळ पॉलिथिनवर पसरविण्यापूर्वी पॉलिथिनवर तेल लावा जेणेकरून घोळ चिटकून बसणार नाही. 3 दिवस कडक उन्हात वाळवा. पापड्या पॉलिथिन वरून बळजबरीने काढून घेऊ नका. नाही तर त्या तुटतील. संपूर्ण वाळल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती