नवरत्न जेष्ठ साहित्य सेवा पुरस्कार व सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार

श्री साई प्रकाशन ( नवरत्न  परिवार ) मिरज आयोजित कै. सौ. लक्ष्मी नारायण कुलकर्णी यांचे स्मरणार्थ दरवर्षी संस्था काही पुरस्कार देत असते. त्यांचा नवरत्न दिवाळी अंक पण निघत असतो. त्यांचा ह्यावर्षीचा 2023 सालचा "नवरत्न जेष्ठ साहित्य सेवा पुरस्कार " शॉपिज़न लेखिका जयश्री देशकुलकर्णी यांना देण्यात आला. त्यांचे पुरस्कार देण्याचे हे विसावे वर्ष आहे. ह्या संस्थेचे सर्वेसर्वा श्री. प्रकाश कुलकर्णी आहे .
 
जयश्री देशकुलकर्णी यांना हा पुरस्कार शॉपिजन प्रकाशित 'भुरळ' आणि 'दृष्टिकोन सकारात्मक विचारांचा' या पुस्तकांसाठी 25 ऑक्टोबर 2023 या दिवशी सन्मान पूर्वक मिरज येथे प्रदान केला.
तसेच जयश्री देशकुलकर्णी यांना या वर्षीचा मराठी साहित्य मंडळ सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार सुद्धा 'सल'( शॉपीजन तर्फे प्रकाशित कथासंग्रह ) साठी   29 ऑक्टोबर 2023 रोजी कराड येथील कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
 
लेखिकेने दोन्ही पुरस्कारांबद्दल शॉपीजनला व मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे ताईंना धन्यवाद दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती