ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. २७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.