आडनावांची जेवणाची सभा

शनिवार, 31 जुलै 2021 (09:06 IST)
आडनावेंनी जोरदार बेत केला जेवणाचा 
सहस्त्रभोजनेंनी विडा उचलला निमंत्रणाचा 
 
सोबत पुजारी पंडित आणि शास्त्री आले 
देवधर येताच देवापुढे दिवे लावले 
 
नंतर श्रीमंत कनकदांडे आले 
सराफांनी कुबेरांना सोबत आणले 
 
गंधे पोहचले अगदी वेळेवर 
टिळक दिसले सर्वांच्या कपाळावर 
 
दूध घेऊन दुधाने पळत आले 
सोबत श्रीखंडे व केळापूर आले 
 
भाजीसाठी भोपळे पालकर जमले 
साल्पेकरानी सगळ्यांना सोलून काढले 
 
पोळी भाजी बरोबर आमटे व तुपे 
काहींना पसंद होते दहिभाते 
 
रसासाठी होते छान केशरी गोडांबे 
मठ्ठा व पाण्यासाठी भरले होते तांबे 
 
पंगत बसण्याअगोदर फडके उत्सुक दिसले 
कचरे व धुळेंना शांतपणे बाहेर काढले 
 
जेवणानंतर गोड करण्यात गोडबोले झाले 
व्यस्त केळकर बोरकर आंबेकरांचे मिश्रण सर्वानी खाल्ले 
 
मस्त नंतर होता कार्यक्रम संगीत व नृत्यांचा 
गीतेच्या गाण्यांवर नाचल्या नर्तकी शृंगारपुरेंच्या 
 
आचार्यांचा सन्मान करण्याचे सगळ्यांनी ठरविले 
मानकारानी शाल श्रीफळ व सव्वालाखे अर्पण केले 
 
खास शौर्यपदक देण्यात आले वाघमारेनां 
कार्यक्रमाचा खर्च नीट सांभाळल्यामुळे शाबासकी मिळाली व्यवहारेंना 
 
तोवर आकाशात सर्वत्र काळमेघ दाटून आले 
काळे व अंधारेंनी समारंभ संपल्याचे घोषित केले

-सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती