का कोपला रे वरुण राजा, तुझ्या लेकरावरी,
त्राहीमाम जाहले रे, अवघ्या पामरावरी,
हाहाकार उडला, झाले जलमय गावं,
रस्ता दिस न कुठं, न कशाला उरला वाव,
जीव मुठीत घेऊन सारे, कसेबसे आहेत उभे,
वाहून गेले घरकुल इवले,सांग काय करावे?
दशा मानवाची झालीया दारुण आता, न उरला थारा,
थांबव ना रे आता तरी, मिळू दे ना सहारा!
दैना आता जरा थांबव, घे जरा विश्रांती तू ही!