स्वयंभू

आतल्या घराकडे पाहात
तो उद्गारला,
आत एकदम अंधार कसा?
मी म्हटलं,
हा अंधार अनेक वर्षांपासनूचा.
तो म्हणाला, हे अनैसर्गिक आहे.
या काळात कधी प्रकाश इथे उगवलाच नही?
उगवला- मी म्हणाला
खूप उगवला जागोजाग उगवला
रंगीबेरंगीही उगवला,
पण तरीही हा अंधार कायमच होता
आणि आहेही,
कारण हा अंधार म्हणजे
प्रकाशाचा अभाव नव्हे
तो स्वयंभू आहे
भिंतीतून झिरपणारा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती