×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
बाप माझा विठ्ठल विठ्ठल
गुरूवार, 12 जुलै 2018 (15:34 IST)
जाडे भरडे कपडे घालून
दाळ-दाणा आणतो
बाजार संपून जाऊसतोर
बाप चकरा हाणतो
बैल होतो हमाल होतो
कष्ट उपसतो खूप
बाप म्हणजे काळसावळ
विठलाचं रूप
ऊन नाही तहान नाही
दिवस रात्र राबतो
घर जातं झोपी पण
बाप एकटा जागतो
लेकराच्या भल्यासाठी
अपमान गिळत राहतो
पाटी आणि पेन्सिलकडे
बाप एकटक पाहतो
पोराच्या डोक्यावरून
फिरवतो झोपित हात
खुशाल ठेव देवा म्हणून
जोडीत राहतो हात
दिसतो तेवढा बाप कधीच
कठोर रागीट नसतो
खरं सांगतो बाप म्हणजे
आईचंच रूप असतो
घळा घळा आसवं गाळून
मोकळी होते माय
दुःख दाबून बाप दाबतो
सावकाराचे पाय
हो म्हणतो लेकरासाठी
पडेल ते काम करील
त्याला साहेब करण्यासाठी
मी नाच करील
खिळे काटे दगड गोटे
पायात घुसत जातात
अंधारात त्याच्या वेदना
पाणी पाणी होतात
कसं होईल काय होईल
चैन पडत नाही
बाप नावाचा संत कधी
दिवसा रडत नाही
फादरचा " डे " फक्त
वर्षातून एकदा असेल का ?
बैल गोठ्यात बसल्यावर
शिवार हिरवं दिसेल का ?
सारं दुःख पोटात गिळून
मानेवर " जू " घेतो
तोंडातून रक्त आलं तरी
गाडा ओढीत राहतो
रक्ताचे थेंब दिसूने म्हणून
तोच टाकतो माती
बाप ज्याला कळतो त्याची
फुटून जाती छाती
आमच्यासाठी काय केलं
असं विचारू नका
म्हाताऱ्या बैलावर
वार करू नका
बापाची तिरडी उचलण्या आधी
पोरांनी शहाणं व्हावं
बाप माझा विठ्ठल विठल
भजनी ठेक्यात गावं
प्रा.विजय पोहनेरकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
बोधकथा : पाच रुपये
नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ
पुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच
बोध कथा : मनःशांती
मदर्स डे शुभेच्छा संदेश
नक्की वाचा
Pitru Paksha Shradh Dates 2025 पितृपक्ष कधीपासून सुरू ? श्राद्धाच्या सर्व तिथींबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी विशेष वास्तु उपाय
स्वयंपाकघरात असलेल्या या 4 गोष्टी खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो
सरकारी बँकांमध्ये 13217 पदांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
झोपण्यापूर्वी दररोज रात्री हे 5 पेये प्या, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील
नवीन
पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन करा
जातक कथा : बेडकाचा रक्षक
Pitrupaksha 2025: श्राद्धपक्षातील पातळभाजी रेसिपी
Silent heart attack: डेस्क जॉब करणाऱ्यांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका का वाढत आहे? लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
BEML Recruitment 2025: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, 243 पदांसाठी भरती
अॅपमध्ये पहा
x