कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करा. आता त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला घाला. व चांगले मिसळा. आता ब्रेडचा स्लाईस घ्या, त्यावर शेझवान चटणी लावा. नंतर त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवा. वर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा आणि हलके दाबा. सर्व ब्रेड सँडविच त्याच प्रकारे तयार करा आणि त्यांना त्रिकोणी आकारात कापून घ्या. आता बेसनामध्ये हळद, लाल मिरची, मीठ आणि ओवा मिसळा. पाणी घाला आणि खूप पातळ किंवा जास्त जाड नसलेले बॅटर तयार करा.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. ब्रेडचे तुकडे बेसनाच्या द्रावणात बुडवा आणि गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. ते टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल. चला तयार आहे आपले गरम ब्रेड पकोडे, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.