New Year 2022 Resolution: नातं घट्ट करण्यासाठी जोडप्याने हे 5 संकल्प घ्यावे

शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (15:22 IST)
नवीन वर्ष आपल्यासोबत नवीन आशा आणि उत्साह घेऊन येतो. लोक गेल्या वर्षाचा निरोप घेतात आणि नवीन वर्षासह नवीन स्वप्ने सजवतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल, नवीन वर्षात काय करायचे आहे, कसे करायचे याचे नियोजन करतात. परंतु केवळ करिअरची ध्येये निश्चित केल्याने काही नवीन वर्ष आनंदी होणार नाही. यासोबतच वर्षातील प्रत्येक दिवस आपल्या जोडीदारासह वेळ घालवणे आणि असणे गरजेचे आहे. आपण  रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या आनंदात भर पडते. नात्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा आणि समस्या आपल्याला अस्वस्थ करू शकतात . त्यामुळे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नात्याशी संबंधित सर्व जुन्या वाईट गोष्टी आणि आठवणी मागे टाकून नव्याने येणाऱ्या वर्षाची सुरुवात करा. नवीन वर्षात लोक काही नवीन संकल्प करतात, असेच काही संकल्प आपल्या नात्याला घेऊन देखील करावे. जेणे करून आपले नाते घट्ट होईल. चला तर मग जाणून घेऊ या की आपण आपल्या जोडीदारासह नातं दृढ करण्यासाठी काय नवे संकल्प घेऊ शकता.
 
1 नात्यापासून खोटेपणा दूर ठेवा- कोणत्याही नात्यातील खोटेपणा नात्याला कमकुवत बनवतो. अशा परिस्थितीत नवीन वर्षात संकल्प द्या की आपण दोघेही एकमेकांशी खोटे बोलणे आणि खोटेपणाने वागणे टाळाल. आपल्या नात्याचा पाया बळकट करण्यासाठी आपण एकमेकांचे मित्र होऊन आणि मोकळ्या मनाने सत्य सांगून समोरच्याचे सत्य समजून घ्या.
 
2 आठवड्यातील एक दिवस  जोडीदारासाठी -  कामाच्या दरम्यान आपण  जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. दररोज त्यांच्या सोबत वेळ घालवणे कठीण होऊ शकते, परंतु नवीन वर्षात संकल्प घ्या की आठवड्यातून एक दिवस किंवा एक संध्याकाळ एकमेकांसह घालवाल . आपण कितीही व्यस्त असलात तरी आठवड्यातून एक संध्याकाळ जोडीदाराला वेळ द्याल. एकत्र वेळ घालवाल. या साठी आपण डिनर डेटवर जाऊ शकता, चित्रपट पाहू शकता किंवा घरी एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. 
 
3 जोडीदाराच्याआवडीची योग्य काळजी घ्या - काही जण अनेकदा नात्याच्या सुरुवातीला जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करता, पण कालांतराने ते  त्यांच्या मनाला समजून घेत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. या नवीन वर्षात आपण जोडीदाराच्या आवडी निवडीची काळजी घ्याल असे संकल्प घेऊ शकता. त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न ते करू शकतात. संयम ठेवा आणि प्रयत्न करा की आपल्या दोघांच्या नात्यात  कोणतीही अडचण येऊ नये.   
 
 
 
4 झोपण्याची वेळ एकत्र ठेवा - काही लोक कामात व्यस्त असल्याने दिवसरात्र विसरतात. हे नात्यात दुराव्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. जरी आपण  दोघंही एकत्र राहत असाल, पण झोपेच्या आणि जागरणाच्या वेळेत झालेल्या बदलामुळे दोघांनाही नात्यात एकटेपणा जाणवतो. संकल्प घ्या की, आपण दोघांची झोपण्याची वेळ एकत्र ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपण कितीही व्यस्त असलात तरी आपल्या झोपण्याची वेळ एकच असणार. जरी कामाच्या व्यस्ततेमुळे झोपेची वेळ समान असू शकत नाही, तर शक्यतो सकाळी उठण्याची एकच वेळ ठेवा. असं केल्याने जोडीदाराला चांगले वाटेल आणि आपले नाते घट्ट होईल. 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती