सोप्या कुकिंग टिप्स

बुधवार, 31 मार्च 2021 (16:58 IST)
स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना झालेली थोडी चूक देखील अन्नाची चव खराब करते. कधी भाजीत तिखट जास्ती होत तर कधी मीठ .अशा परिस्थितीत काय करावे. या साठी सोप्या कुकिंग टिप्स  सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 भाजीत तिखट जास्ती झाले असल्यास भाजीत उकडलेले बटाटे मिसळा. हे  बटाटे भाजीतील तिखट शोषून घेतात. या शिवाय आपण क्रीम ,दही किंवा मलई देखील मिसळू शकता. 
 
2 बेसनाचे लाडू करताना बेसन मंद गॅस वर भाजून घ्या आणि सतत ढवळत राहा. जेणे करून या मध्ये गुठळ्या होऊ नये. 
 
3 साखरेचा पाक करताना त्या भांड्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावा जेणे करून साखरेचा पाक भांड्याला चिटकणार नाही. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती