चांगली नोकरी मिळविण्यासाठी हे उपाय अवलंबवा

बुधवार, 31 मार्च 2021 (09:45 IST)
कोरोना कालावधीने लोकांच्या जीवनशैलीतही मोठा बदल केला आहे. आता काम करण्याचा मार्गही बदलला आहे.बऱ्याच कंपन्यांनी सध्या घरातूनच काम करण्याची संस्कृती अवलंबविली आहे. आज आम्ही असे काही करिअर टिप्स सांगत आहोत ज्या आपल्यासाठी खूप कामी येतील. 
 
* आपल्या रिज्युमेला अपडेट ठेवा- नेहमी आपल्या रिज्युमेला अपडेट ठेवा. आपण या मध्ये काय लिहिले आहेत त्याची माहिती ठेवा. सोशल मीडियाची माहिती ठेवा.आपण या कामासाठी सक्षम आहात किंवा नाही हे समजू शकाल.
आपण जे काही काम करण्याची इच्छा बाळगता त्यासाठी संपूर्ण माहिती मिळवा. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या फायनान्स कंपनीत प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत असाल आणि टेकमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर बनण्याचे आपले लक्ष्य असेल तर आपल्याला टेक कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यात कसे कार्य करतात  ते शोधायला पाहिजे. अशा आधारे आपण आपले रिज्युमे बनवावे. 
 
* शिक्षा आणि प्रशिक्षण चे प्रकार समजून घ्या- आपण ज्या क्षेत्रात काम करण्याचे इच्छुक आहात त्याची माहिती मिळवा त्याच्या बद्दल जाणून घ्या. या साठी आपण एखादे प्रशिक्षण घेऊ शकता.
 
* नेटवर्क - आपले नेटवर्क वाढवा,यासाठी आपण सोशल मीडियाची मदत घेऊ शकता. आपल्या क्षेत्राशी निगडित लोकांशी जुडून राहा आणि त्यांची मदत घ्या. अशा लोकांशी बोला आणि भेट घ्या, जे आपले आत्मविश्वास वाढवतील. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती