चिमणी स्वच्छ करण्याची पद्धत -
*डिशवॉशिंग लिक्विड- चिमणीचे फिल्टर काढून एका टबात गरम पाणी घालून बुडवून द्या. पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड घालून चिमणीचे फिल्टर एक दोन तासासाठी भिजत ठेवा. नंतर स्क्रबरने धुऊन घ्या.
* बेकिंग सोडा- गरम उकळत्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये फिल्टर पूर्णपणे भिजत ठेवा.2-3 चमचे बेकिंग सोडा, 2-3 चमचे मीठ आणि दोन कप व्हिनेगर घाला. एक ते दोन तास सोडा. आपल्याकडे स्टीलचा मोठा कंटेनर असल्यास, या सर्व सामग्रीसह फिल्टर उकळवा.नंतर स्क्रबरने स्वच्छ करा.