किचन हँक्स किचन स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स

शनिवार, 27 मार्च 2021 (08:20 IST)
* काचेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी चिरलेला बटाटा घासा नंतर स्वच्छ कपड्याने किंवा वर्तमान पत्राने पुसून घ्या. 
 
* स्नानगृह, बाथटब आणि टॉयलेट सीट वरील पिवळे डाग काढण्यासाठी मीठ आणि टार्पेन्ट तेलाचा वापर करा. 
 
* फरशीवरील जुनाट हट्टी डाग काढण्यासाठी सोड्याच्या पाण्याने स्वच्छ करा. 
 
  * पडद्यावरील कोल्डड्रिंक चे डाग काढण्यासाठी पडदा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. डाग नाहीसे होतील. 
 
* संत्र्याचे साली वाटून भुकटी बनवा. या मध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवून त्या  पेस्टने काचेचं आणि लाकडी सामान स्वच्छ करा. 
 
* मार्बल च्या फरशीवरील डाग काढण्यासाठी पाण्यात डिशवॉश लिक्विड च्या काही थेम्ब मिसळून घोळ बनवा. या घोळत स्पॉंज मिसळून डाग असलेल्या जागी घासा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. डाग नाहीसे होतील. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती