मेनोपॉज काळात शारीरिक आणि मानसिक फिट राहण्यासाठी टिप्स

शुक्रवार, 26 मार्च 2021 (18:27 IST)
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मेनोपॉजचा काळ येतो. या काळात दर महिन्यात येणारी मासिक पाळीची काळजी नसते. या काळात काही हार्मोनल बदल होतात. या मुळे शारीरिक त्रास उद्भवतात. मानसिक दृष्टया देखील बदल होतात. अशा परिस्थितीत काही उपाय आहे ज्यांना अवलंबवून आपण मानसिक आणि शारीरिक दृष्टया फिट राहाल.चला तर मग जाणून घ्या. 
 
1 योग्य आहार घ्या- चांगला आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मेनोपॉज मुळे पचन शक्ती कमकुवत होते. तसेच यावेळी आपली प्रतिकारक शक्ती बळकट असणे देखील महत्त्वाची आहे. म्हणून योग्य आहार घ्या  आणि फिट राहा. 
 
2 व्यायाम- या काळात वजन वाढणे सामान्य आहे , थकवा जाणवतो की काहीच करावेसे वाटत नाही. दररोज व्यायाम करा जेणे करून आपण फिट राहाल. 
 
3 स्वतःला क्रियाशील ठेवा-या काळात काहीच करायची इच्छा होत नाही. या साठी स्वतःला क्रियाशील ठेवा. या मुळे नकारात्मकता दूर होईल. कोणत्याही छंदवर्गात जाणे सुरु करा. आपली आवडती कला जोपासा. यामुळे आपण क्रियाशील बनून राहाल. 
 
4 कुटुंबाची साथ -मेनोपॉजच्या काळात हार्मोन्सच्या बदलमुळे चिडचिड वाढते. कुटुंबातील सदस्य बऱ्याच वेळा आपल्या समस्येला समजू शकत नाही. घरातील सदस्यांशी मनमोकळेपणाने बोला. ते आपली समस्या समजून घेतील. 
 
5 लेखन-वाचन करा- एकाकीपणा जाणवत असल्यास लेखन किंवा वाचन करावे. आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळेल. 
 
6 मानसिक दृष्टया सज्ज राहा- मेनोपॉजचा काळ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो .या साठी घाबरून जाऊ नका.स्वतःला मानसिक दृष्टया तयार ठेवा आणि हिमतीने या काळाला सामोरी जा.    
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती