वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 26 मार्च 2021 (09:05 IST)
संपूर्ण वर्ष आपल्याला अनेक विषय वाचायचे असतात, त्या विषयात एवढे धडे असतात आणि त्या धड्यांमध्ये कितीतरी प्रश्न आणि उत्तरे असतात. त्यांना लक्षात ठेवणे अवघड होते. बऱ्याच वेळा असे होते की आपण ते उत्तरे विसरून जातो. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण वाचलेले सहज लक्षात ठेवू शकतो. चला तर मग जाणून घ्या. 
 
1 पाठांतर केल्यावर लिहून बघा- ही शिकवण आपल्याला आपले वडीलधारी देतात. या मागील कारण असे आहे आपण जेवढे आपल्या ज्ञानेंद्रियांना चालना देतो ते आपल्यावर प्रभाव पाडतात.पाठांतर करून लिहून बघितल्याने अवयव सक्रिय होतात, म्हणून लिहून ठेवलेले दीर्घ काळ लक्षात राहत. 
 
2 सकाळी वाचन करा- सकाळी शांतता असते, या मुळे मेंदू सहजपणे गोष्टींना ग्राह्य करतो. म्हणून सकाळच्या वेळी अभ्यास केल्याने चांगल्या प्रकारे लक्षात राहते. एकाग्रता देखील राहते. म्हणून विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. 
 
3 एक-एक करून विषय हाताळा- एकत्ररित्या वाचणे कधीही चांगले नाही. सर्व विषय आपण एकत्र वाचू शकत नाही. या मुळे गोंधळाल आणि वाचलेलं लक्षात राहणार नाही. म्हणून एका वेळी एकच विषय वाचावे. जेवढे वाचाल ते एकाग्रतेने वाचावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती