एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.
शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली “क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावरुन काही आंबे तोडू पाहत होते परंतू म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही म्हणून दगड मारुन फळं तोडत होते पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला.
तर मित्रानों सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत. आज लोकं लहान-सहान गोष्टींवर क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घेऊ बघता, मारहाण करतात अशात शिवाजी महाराजांचा हा प्रसंग निश्चित आम्हाला सहिष्णु आणि दयाळू असावं याची जाणीव करवून देतो.