पंचतंत्र कहाणी- कासव आणि ससा यांची गोष्ट

शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:03 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक ससा राहायचा. ज्याला आपल्या गती वे खूप अहंकार होता. त्याला जंगलात कोणीदेखील दिसले तर तो त्याच्याशी पैज लावायचा व शर्यत जिंकायचा. सर्वांसमोर खूप स्वतःचे कौतुक करायचा व इतरांचा अपमान करायचा.
 
एकदा जंगलात फिरत असतांना त्याला एक कासव दिसले. त्याचा हळूपणा पाहून सश्याने त्याच्याशी शर्यत लावायची ठरवली.जंगलात असलेल्या डोगंरावर जो कोणी आधी पोहचेल तो जिंकेल. कासवाने सश्याची शर्यत करण्यासाठी संमती दिली व शर्यतसाठी तयार झाले. जंगलातील सर्व प्राणी ससा आणि कासवाची शर्यत पाहण्यासाठी जमा झाले. शर्यत सुरु होताच कासव ससा पळायला लागला व कासव मात्र हळूहळू चालत होते. पुढे गेल्यावर सश्याने वळून पहिले तर कासव कुठेही दिसले नाही.  सश्याने विचार केला की कासव खूप हळू चालते आहे त्याला इथपर्यंत येण्यासाठी खूप वेळ लागेल.मी थोडावेळ अराम करून घेतो. व तो तिथेच झोपून गेला.
 
थंडगार हवा असल्याने सश्याला झाडाखाली गार झोप लागली.कासव हळूहळू डोंगरावर पोहचून गेले. इकडे सश्याला जाग आली व त्याला समजले की खूप उशीर झाला आहे तो पळत पळत डोंगरावर गेला. व त्याने पहिले की कासव आधीच डोंगरावर पोहचून शर्यत जिंकले आहे. कासव शर्यत जिंकले म्हणून सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या. व त्याचे कौतुक केले. कासव शर्यत जिंकले व सश्याने मान्य केले. 
 
तात्पर्य- जो संयमाने आणि मेहनतीने काम करतो,  त्याचा विजय निश्चित असतो.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती