पंचतंत्र कहाणी : हुशार करकोचा आणि लबाड कोल्हा

मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (12:55 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक कोल्हा आणि एक करकोचा पक्षी राहत होते. ते चांगले मित्र होते. करकोचा रोज तलावातून मासे पकडून कोल्ह्याला खायला दयायचा. यामुळे दोघांची घट्ट मैत्री होती.
 
करकोचा खूप साधा आणि सरळ होता. पण कोल्हा खूप धूर्त आणि पाताळयंत्री होता. तो नेहमी दुसऱ्यांच्या खोड्या काढायचा. त्याला दुसर्यांचा अपमान करण्यात फार मज्जा यायची.
 
त्याने एकदा विचार केला की, आपण या करकोचाची फजिती करून त्याचा अपमान करू या. व त्याने करकोचा पक्षीलाला घरी जेवायला बोलावले. 
 
त्याने जेवणासाठी सूप बनवले आणि तो करकोचा पक्षीची वाट पाहू लागला. थोड्या वेळातच करकोचा पक्षी तिथे आला. व आता कोल्ह्याने जेवणाची तयार केली व मुद्दाम सूप ताटलीमध्ये वाढले. त्याला माहिती होते की करकोचा पक्षीची  चोच खूप लांब असते ज्यामुळे त्याला ताटलीतील सूप पिता येणार नाही. कोल्हा म्हणाला मित्र करकोचा ये सूप पी. पण करकोच्याला सूप पिता येईना. हे पाहून धूर्त कोल्हा मनामध्ये हसायला लागला. व जाणीवपूर्वक करकोच्याला म्हणाला की, मित्र तुला सूप आवडले नाही का? सूप तर खूप स्वादिष्ट बनले आहे. असं म्हणून कोल्हा करकोचा पक्षीच्या वाटेचे देखील सूप पिऊन टाकतो. बिचारा करकोचा त्यादिवशी उपाशी राहिला व हताश होऊन आपल्या घरी परत निघून गेला. 
 
आता घरी येऊन करकोच्याने खूप विचार केला व त्याला जाणवले की, कोल्ह्याने जाणीवपूर्वक आपला अपमान केला आहे. व आपल्याला कोल्ह्यामुळे उपाशी राहावे लागले आहे. आता मी कोल्ह्याला धडा शिकवले आणि माझ्या झालेल्या अपमानाचे उत्तर देईल. आता करकोच्याने कोल्ह्याला जेवणासाठी आमंत्रित केला. 
 
करकोच्याने देखील जेवणामध्ये सूप बनवले. व कोल्ह्याची वाट पाहू लागला. थोड्यावेळाने कोल्हा तिथे आला. आता करकोच्याने जेवणाची तयारी केली व सूप जग मध्ये वाढले. आता जग उंच असल्यामुळे कोल्ह्याला सूप पिता येत नव्हते. तर करकोचा जग मध्ये चोच घालून सूप चा आस्वाद घेत म्हणाला की, सूप खूप स्वादिष्ट बनले आहे. काय झाले मित्र तू सूप का पीत नाही आहे. तुला आवडले नाही का तर दे मी पिऊन टाकतो. असं म्हणून करकोच्याने कोल्ह्याच्या वाटेचे देखील सूप पिले. आता मात्र क्लोह्याला अपमानास्पद वाटले व तो तिथून निघून गेला व घरी आला. त्यादिवशी कोल्ह्याला काहीही खायला मिळाले नाही व कोल्ह्याला आपण करकोचा सॊबत कसे वागलो हे आठवत राहिले. व कोल्हा हताश झाला. 
तात्पर्य- कधीही कोणाचाही अपमान करू नये, आपण जसे दुसर्यांसोबत वागतो तेच आपल्या सोबत घडत असते.   
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती