कृती- 
	सर्वात आधी आवळे स्वछ धुवा. आता प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घाला आणि  शिट्ट्या होईपर्यंत उकळवा. थंड झाल्यावर, बिया काढून टाका आणि आवळा हलके मॅश करा किंवा मिक्सरमध्ये बारीक करा. आता एका पॅनमध्ये गूळ आणि अर्धा कप पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवा. बारीक केलेला आवळा घाला आणि पाच मिनिटे मंद आचेवर शिजवा. आता त्यात लाल तिखट, मीठ, काळे मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि बडीशेप पावडर घाला आणि ढवळत राहा जेणेकरून चटणी  चिकटणार नाही. चटणी थोडी घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा. चटणी थंड होऊ द्या, नंतर ती काचेच्या बाटलीत भरा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ही चटणी १-२ महिने टिकेल. तसेच तयार चटणी पराठा किंवा पुरी सॊबत नक्कीच सर्व्ह करा.