2) विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे, आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की, सेलची लाँटरी लागलीच, समजा.
3) निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली, की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून, यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.