त्यांनी 'बाबुराव ला पकड', 'जय गंगागिरी महाराज' आणि 'नाथ हा माझा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लिहिली आहे. याशिवाय त्यांनी काही मराठी दूरदर्शन कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले. शुक्रवारी आशिष यांचा धाकटा भाऊ सारंगला भेटण्यासाठी नागपूरला आले होते , असे सांगितले जाते. सारंग हे रामकृष्ण मठाचे सेवक आहे. सारंगने त्यांना मठातीलच पाहुण्यांच्या खोलीत राहायला सांगितले होते.
आशिष उबाळे यांची चित्रपटसृष्टी आणि मराठी टेलिव्हिजनमध्ये दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. 'अग्नी', 'एका श्वासाचे अंतर', 'गजरा' आणि 'चक्रव्यूह' अशा अनेक लोकप्रिय मराठी मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. याशिवाय त्यांनी 'गार्गी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली.