कोमट पाण्यासवे बडीशेप घेत ल्यास गॅसेसची समस्या नाहीशी होते. बडीशेप, खडीसाखर आणि बदाम मिक्सरमध्ये एकत्र वाटू घ्या. दररोज रात्री एक चमचा या प्रमाणात हे मिश्रण खा आणि कपभर दूध घ्या. हा उपाय डोळ्यांचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं.
बडीशेपमध्ये पोटॅशियमची विपूल मात्रा असल्यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो. भूक मंदावणं, पोट फुगणं, गॅसेस होणं आदी समस्यांवर भाजलेली बडीशेप खाणं हा रामबाण उपाय आहे.